⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

एरंडोल येथील दंड न भरलेल्या वाहनांचा होणार लिलाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । एरंडोल तालुक्यातील अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करताना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द्व दंडात्मक नोटीस व आदेश पारित करण्यात आले आहेत.परंतु,सदर वाहनाच्या मालकांनी दंडात्मक कारवाईतील आदेशित रक्कम शासनजमा केलेली नाही.त्यामुळे जप्त वाहनांची विक्री करून दंडात्मक कारवाईतील रक्कम वसूलीसाठी ३० रोजी तहसिल कार्यालय एरंडोल येथे वाहनांचा जाहिर लिलाव घोषित केला आहे.

सविस्तर असे की, एरंडोल तालुक्यातील अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करताना आढळून आलेली वाहने जप्त करून पोलीस स्टेशन एरंडोल व कासोदा येथे लावण्यात आलेले आहेत. सदर वाहन मालक यांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक केले बाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु,संबंधित वाहन मालक यांनी दंडात्मक रक्कमेचा भरणा अद्याप केलेला नसल्याने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १७६ ते १८४ मधिल तरतुदी नुसार जप्त केलेल्या वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून उक्त नमुद तरतुदी नुसार जप्त वाहनांचा लिलाव करुन लिलावातुन प्राप्त होणारा महसुल शासनास जमा करण्याची कार्यावाही या कार्यालयाकडील वाहन लिलाव उदघोषणा जा.क्र. / कावि / गौ.ख / ५५७ / २०२१ दि. ०८/१२/२०२१ नुसार नियोजित करण्यात आली असून ती जिल्हाधिकारी जळगांव यांच्या वेबसाईट https://jalgaon.gov.in/notice_category वर प्रसिध्द करण्यात आली आहे व त्यानुसार दि.३०/१२/२०२१ रोजी तहसिल कार्यालय एरंडोल येथे जप्त वाहनांचा जाहिर लिलाव करण्यात येणार आहे.