---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव

चाळीसगावात सात वर्षीय बालिकेचे अपहरण करून अत्याचाराचा प्रयत्न

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२५ । राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान चाळीसगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका भागात राहणाऱ्या सात वर्षीय बालिकेला तिच्या शेजारी राहणाऱ्या आरोपीने अपहरण करून तिचे कपडे काढून बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र या बालिकेला शिकवलेल्या बॅड टच मुळे ती प्रसंगावधान झाली आणि संशयित आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले. आरोपीविरोधात अपहरण पोस्को व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

crime 3

चाळीसगाव शहरामधील एका भागात सात वर्षाची मुलगी तिच्या आजीसोबत राहते. कोल्ड्रिंक घेण्यासाठी जात असताना घराशेजारी राहणारा आरोपी विठ्ठल उत्तम जगताप याने बालिकेचे तोंड दाबून, अपहरण करत परिसरातील पडक्या घरात नेऊन तिचे कपडे काढून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र बालिकेने प्रसंगवधान दाखवीत त्या ठिकाणाहून पळ काढला.

---Advertisement---

याप्रकरणी निलाबाई नारायण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अपहरण पोस्को व ॲट्रॉसिटीचा गुन्हा करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी हे करीत आहेत. संशयित आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment