⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | धक्कादायक : विखरण येथे पेट्रोल टाकून महिलेला पेटवून देण्याचा प्रयत्न

धक्कादायक : विखरण येथे पेट्रोल टाकून महिलेला पेटवून देण्याचा प्रयत्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२१ । एरंडोल येथून जवळपास पाच किलोमीटर अंतरावरील विखरण येथे १३ ऑगस्ट २१ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मायाबाई अशोक पाटील या विवाहितेला आरोपी खुशाल तोताराम पाटील (बागुल) याने दारूच्या नशेत व रागाच्या भरात शिवीगाळ करत त्यांच्याशी भांडण केले. व दुचाकी मधील पेट्रोल डब्यात काढून महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून  पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

या घटनेत महिला वीस टक्के भाजली असून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार होऊन तिला पुढील उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला भाग पाच गुर नं १५५/२१. भादवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला शेतमजूरांचा मुकादम म्हणून काम करीत असल्याचे समजले.

याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मायाबाई अशोक पाटील ही महिला इंदिरानगरमधील जिजाबाई लटकन मिस्तरी हिच्या घरासमोर खाटेवर बसून तू उद्या कामाला येशील का असे तिला विचारत असताना त्या ठिकाणी खुशाल तोताराम पाटील हा त्या ठिकाणी दुचाकीने आला व दारूच्या नशेत तो मायाबाई पाटील ला शिवीगाळ करून तू इथे का बसली असे बोलून भांडण केले
तसेच आरोपी खुशाल पाटील याने त्याच्या दुचाकी तील पेट्रोल डब्यात काढून मायाबाई पाटील ईच्या अंगावर टाकले व आगकाडीने आग लावून तिला जाळून मारून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

समाधान सुक्राम गायकवाड याने एरंडोल पोलीस स्टेशनला या बाबत माहिती दिली. दरम्यान पोलीस पाटील विनायक पाटील व काही ग्रामस्थांनी सदर महिलेला भाजलेल्या स्थितीत एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.