जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । जम्मू काश्मीर सीमेवर सीमा सुरक्षा दलाचे जवानांनी नुकतेच एका ऑपरेशनमध्ये भारतात घुसखोरी करणाऱ्या 3 घुसखोरांना कंठस्थान घातले. २०० कोटींच्या ड्रग्ससह शस्त्रे पथकाने हस्तगत केली. मिशन फत्ते करणाऱ्या या पथकात जळगाव जिल्ह्यातील जवानाचा देखील समावेश होता. जळगावकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन घुसखोरांना भारतीय सैन्याने २१ राउंड फायर करीत कंठस्थान घातले. यावेळी त्यांच्याकडून सुमारे २०० कोटी रुपये आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत असेलेले सुमारे ३६ किलो ड्रग्स, पाकिस्तानी चलन तसेच १ पिस्तुल, १ मॅगजीन व ३ राउंड जप्त केले. भारतीय सीमा सुरक्षा दल (बी.एस.एफ) यांनी ही कार्यवाही केली.
यात विशेष अभिमानाची बाब म्हणजे या कार्यवाहीत जळगाव जिल्ह्यातील देखील एका जवानाचा सहभाग होता. त्यांनी आपल्या अतुल्य पराक्रमाने या पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्तान घातले. याकामगिरी बद्दल या सर्व जवानांना सैन्यदलातर्फे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या या कामगिरीने जिल्हावासियांची मान नक्कीच उंचावली आहे. त्यांचे या कामगीरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
(सैनिकांच्या सुरक्षतेच्या कारणास्तव आणि गोपनीयता राखण्यासाठी सदर बातमीतील नावे हटविण्यात आली आहे.)
हे देखील वाचा :
- चाळीसगाव मतदारसंघात कोणता आमदार निवडून येणार? पाहा exit Poll
- महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? वाचा सट्टा बाजाराचा अंदाज?..
- 14 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन! प्रलंबित खटले असणाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
- ग्राहकांना पुन्हा झटका! जळगाव सुवर्णपेठेत सोन्याचे दर २२०० रुपयांनी वाढले
- जळगाव शहरातून पुन्हा राजूमामा भोळे आमदार होणार? पाहा EXIT POLL