---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

अमळनेरात एमपीडीएतून सुटून आलेल्या सराईतावर जीवघेणा हल्ला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२५ । अमळनेर येथे एमपीडीएतून सुटून आलेल्या सराईतावर सात ते आठ जणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. सोमवारी सकाळी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत ही घटना घडली. विशाल दशरथ चौधरी असे हल्ला झालेल्या इसमाचे नाव असून तो या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे. या घटनेने अमळनेर शहरात खळबळ उडाली आहे.

marhan

विशाल चौधरी हा १ रोजी एमपीडीएतून सुटून आला आहे. त्याच्यावर दुसऱ्यांदा एमपीडीए कारवाई झाली होती. ३ रोजी तो बाजार समितीच्या आवारात कामासाठी आला असता त्याच्यावर सात ते आठ जणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला करत मारहाण केली. या हल्ल्यात विशाल चौधरी याच्या डोक्यावर तीन ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर तो घटनास्थळी पडलेला होता. त्याला नागरिकांनी तातडीने उपचारासाठी दाखल केले. तेथून त्याला धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. यानंतर घटनास्थळी मोठी धावपळ उडाली होती.

---Advertisement---

दरम्यान पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले आहेत. जखमीच्या जबाबानंतर गुन्हा दाखल होऊन कारवाई करण्यात येईल. अशी माहिती पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी दिली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---