जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे दिसतेय. अशात यावल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शौचालयासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढत नेत तिच्यावर दोन नराधमांनी बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. याबाबत दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप चंद्रकांत धनगर आणि मयुर अनिल धनगर असे संशयित दोघी नराधमांचे नाव आहे.
काय आहे घटना?
१५ वर्षीय अल्पवयीन मुलगी यावल तालुक्यातील एका गावात आपल्या कुटुंबियांसह राहते. बुधवारी २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली असता यावेळी गावातील संशयित आरोपी प्रदीप धनगर आणि मयुर धनगर यांनी अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले. त्याठिकाणी दोघांनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला.
जीवेठार मारण्याची धमकी
दरम्यान कुणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलगी घरी गेल्यावर हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. अल्पवयीन मुलीसह नातेवाईकांनी यावल पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता धाव घेवून दोन्ही संशयित आरोपींविरोधात तक्रार दिली.
गुन्हा दाखल
पीडित मुलीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रदीप चंद्रकांत धनगर आणि मयुर अनिल धनगर यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहेत.
हे देखील वाचा :
- धरणगाव तालुक्यात एसटीला भीषण अपघात; 28 प्रवासी जखमी
- एकलव्य रेसिडेन्सी स्कूलच्या 1,257 जागांसाठी 23 फेब्रुवारीला प्रवेश पूर्वपरीक्षा
- रब्बी हंगामातील पिक विमा उतवण्यासाठी १५ डिसेंबर पर्यंत मुदत
- जळगावच्या ग.स.ला आमदार सत्यजित तांबे यांची भेट
- मोठी बातमी ! अल्लू अर्जुनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?