---Advertisement---
बातम्या वाणिज्य

ATM मशिनमधून पैसे काढणे महागणार; 1 मे पासून बदलणार नियम

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जर तुम्ही वारंवार एटीएममधून पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण १ मे २०२५ पासून एटीएम मशिनमधून पैसे काढणे महागणार आहे.

ATM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या प्रस्तावास मंजुरी दिल्यांनतर आता एटीएम वापरावरील शुल्क वाढवले ​​आहे. आता, मोफत व्यवहार मर्यादा ओलांडल्यानंतर, तुम्हाला प्रत्येक वेळी पैसे काढताना किंवा बॅलन्स चेक करताना अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे.

---Advertisement---

किती पैसे मोजावे लागणार?
आता दुसऱ्या बँकेच्या एटीएम मशिनमधून पैसे काढणे महागणार आहे. 1 मे पासून हा बदल लागू होणार आहे. त्यानुसार, ठरवून दिलेल्या लिमिटनंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास आता 17 ऐवजी 19 रुपये चार्ज लागणार आहे. तसेच, बॅलेन्स चेक करण्याचा चार्ज देखील 7 रुपयांवरन 9 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, सध्या बँकांकडून दुसऱ्या बँकेतील एटीएममधून पैसे काढण्यासाठी मेट्रो शहरात 5 आणि नॉन मेट्रो शहरात 3 व्यवहार मोफत दिले जात आहेत. मात्र, तीनपेक्षा जास्त व्यवहारांवर चार्ज लावण्यात येतो.

एटीएम चार्ज वाढवल्याने एटीएम नेटवर्क ऑपरेटर आणि व्हाईट लेबल एटीएम कंपन्यांकडून इंटरचेंज फीस वाढविण्याची मागणी होत आहे. सध्या, त्याचे मेन्टेनन्स आणि ऑपरेशन खर्च पूर्वीच्या तुलनेत वाढलेले आहेत. त्यातच, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ही मागणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासमोर ठेवण्यात आली आहे. त्यास, आरबीआयने ग्रीन सिग्नल दिला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment