Jalgaon : प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली रंगत
जळगाव लाईव्ह न्यूज । 26 जानेवारी 2024 । पोलीस कवायत मैदानावर आज पार पडलेल्या प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळ्यात विविध कला अविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. जिल्ह्यातील विविध शाळांमधील बालचमूंनी सादर केलेले मल्लखांब, लाठी-काठी, लेझीम नृत्य, साहसी मानवी मनोरे, योगासने, कराटे प्रात्यक्षिक व देशभक्तीपर गीत सादरीकरणास मान्यवर व नागरिकांनी टाळ्या कडाकडाट करून दाद दिली. याप्रसगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती, पुरस्कार्थी व शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांचा ही सत्कार करण्यात आला.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणांनतर राष्ट्रगीत, राज्यगीत व राष्ट्रध्वजाला सलामी पार पडल्यानंतर पालकमंत्र्यांचे उपस्थित नागरिकांना उद्देशून शुभेच्छा संदेशाचे भाषण पार पडले. भाषणानंतर जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक दाखविले. मल्लखांब कौशल्य दाखवितांना कुमारवयीन विद्यार्थ्यांची चपळता व शारीरिक कसरत पाहून उपस्थित आवाक झाले.सावखेडे येथील ब.गो.शानबाग विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थींनींनी तालबध्द पध्दतीने लाठी काठी व लेझील नृत्याचे दर्शन घडविले. डॉ.अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या मुलांच्या संघाने जिम्नॅस्टिकमधील योगासन कौशल्य दाखविले. पोलीस पथकांतील बालचमूंनी कराटेचे मनोवेधक सादरीकरण केले.एकाहून-एक सरस प्रात्यक्षिक, कला-कौशल्य दाखवितांना तरूणाईची चपळता पहायला मिळाली.
यांचा झाला सन्मान
युनिट 230 बटालियन सीआरपीएफ देशांतर्गंत सुरक्षा संबंधी ऑपरेशनमध्ये मु.पो.मालीवादा, जि.दंतेवाडा (छत्तीसगड) येथील जंगल क्षेत्रामध्ये गस्त घालताना माओवाद्यांनी लावलेल्या आय.ई.डी.विस्पोटामध्ये 30 मार्च 2016 रोजी शहीद झाले. त्यांच्या शौर्याच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनामार्फत त्यचे पश्चात त्यांचे पत्नी निता नाना सैंदाणे यांना ताम्रपट देऊन पालकमंत्र्यांच्या हस्त आज सन्मानित करण्यात आले.
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज आणि हॉस्पीटल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, जळगांव यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी कलाबाई चिंतामण कोळी कमलबाई रमेश गायकवाड (मोहाडी) व शिवलाल गरीमा सोनवणे (देवगाव) यांना जागेचा मालकी हक्क व नकाशाची सनद प्रदान करण्यात आली. इट राईट कॅम्पस् (Eat Right Campus) अंतर्गत उल्लेखनीय कामगिरीबद्दल अन्न व औषध प्रशासन विभागाचा सन्मान करण्यात आला.
कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीमार्फत पुरस्कार : वैष्णव सुरेश चौधरी, कु.पायल मुरलीधर घुले, कु.गायत्री सुकलाल पाटील, कु.गौरी शरद पाटील, दिनेश सुकलाल पावरा, कु.पायस रवीकिरण सावळे, हितेश रविंद्र पाटील, प्रविण संजय पाटील, ओम राजेंद्र पाटील, सायमा अयुब गवळ यांना यावेळी प्रत्येकी 1 लाख रूपये बीज भांडवल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.