सध्याच्या काळात रक्तदान शिबिराचे आयोजन गरजेचे : भरत अमळकर
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । कोरोना नंतरच्या सध्याच्या काळात वैद्यकीय शस्त्रक्रियांसाठी रक्ताची टंचाई जाणवत असल्यामुळे शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केशवस्मृती सेवा समुहाचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटीतर्फे शामनगर येथे पंचकृष्ण प्रबोधन बहुउद्देशीय संस्था व शामसेवा समरसता मंच यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते. परिसरातील गरजू विद्यार्थ्यांसाठी रोटरी गोल्ड सिटीने ई-लर्निंग प्रकल्प राबवावा, त्यास केशव स्मृतीतर्फे संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देऊन स्थानिकांनी यासाठी पुढाकर घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून रोटरी गोल्डसिटीने या रोटरी वर्षात जुलैपासून आजपर्यंत चार महिन्यात चार रक्तदान शिबिरांचे आयोजन केले असून त्यात २५० पेक्षा अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. आगामी काळात आणखी दोन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष उमंग मेहता यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
४० रक्तदात्यांनी घेतला सहभाग
शिबिरात ४० रक्तदात्यांनी सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी रोटरी गोल्डसिटीचे मानद सचिव डॉ. निरज अग्रवाल, नंदु आडवाणी, निलेश जैन, प्रकल्प प्रमुख मेहूल त्रिवेदी, प्रखर मेहता, निखील चौधरी, प्रवेश मुंदडा, प्रशांत कोठारी, प्रितेश वेद, राहूल कोठारी, पंचकृष्ण प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील, उत्तम चव्हाण, पी.आर. पाटील, समाधान पाटील, रतनकुमार थोरात, विकास पाटील, चंद्रकांत पाटील, तुषार निकुंभ, चिरंजीव सैनी, गोळवलकर रक्तपेढीचे वीरभूषण पाटील, जागृती लोहार, श्रीकांत मुंडले, उदय सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.