⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | दहिगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती फलकाची विटंबना

दहिगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती फलकाची विटंबना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२३ । यावल तालुक्यातील दहिगाव येथे एक मोठा प्रकार घडलाय. येथील मुख्य चौकातील महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताच्या शुभेच्छा फलकाची विटंबना केली आहे. यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्मित झाले असून पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिलीय.

गेल्या दोन दिवसापूर्वी म्हणजेच १४ एप्रिल रोजी देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती निमित्त दहिगाव येथील गावातील मुख्य चौकात महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. मात्र काही समाजकंटकांनी जयंती निमित्ताच्या शुभेच्छा फलकाची विटंबना केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. घटनेची खबर मिळताच फैजपूर उपविभागीय पोलीस अधिक उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर गावातील वातावरण तणावपूर्ण शांत असून सर्व शेतीचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत. पोलीस बंदोबस्त तैनात असून उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे राकेश मानगावकर ,पोलीस अधिकारी व ताफ्यासह तळ ठोकून आहेत

दरम्यान महापुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा फलक विटंबना प्रकरणी पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी पत्रकारांना दिली. दहिगाव गावात विटंबनानंतर तणावपूर्ण वातावरण असल्याने यावल ते दहिगाव सावखेडा बस सेवा सकाळ पासून बंद करण्यात आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.