⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | वाणिज्य | सणासुदीत फक्त 750 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळेल, असा घ्या लाभ

सणासुदीत फक्त 750 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळेल, असा घ्या लाभ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । येत्या २६ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. यानंतर विजय दशमी आणि दीपावली तुमच्या आनंदात भर घालण्यासाठी येईल. सणासुदीच्या काळात तुमचा उत्साह दैनंदिन तुलनेत दुप्पट असतो, कारण या काळात तुम्ही भरपूर खरेदी आणि स्वयंपाक घरच्या घरी करता. पण या सणासुदीत महागड्या गॅस सिलिंडरच्या दरापासून तुम्हाला दिलासा मिळू शकतो.

ते कसे याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत घरगुती गॅस सिलिंडर घेऊ शकता. यासाठी गॅस वितरणाशी निगडीत सरकारी कंपनी इंडेनने कमी दरात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्या अंतर्गत एखादी व्यक्ती नवीन घरगुती गॅस सिलिंडर घेईल, तर त्याला फक्त 750 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळेल. या ऑफर अंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांना कंपोझिट सिलिंडर देत आहे. हे खरेदी केल्याने तुमचे किमान 300 रुपये वाचतील.

कंपोझिट सिलिंडर गेल्या काही काळापासून खूप चर्चेत आहे. या सिलेंडरची खास गोष्ट म्हणजे तुम्ही ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे ट्रान्सफर करू शकता. या सिलेंडरचे वजन सामान्य सिलेंडरपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणेही सोपे असते. राज्यात 4.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे. अशा परिस्थितीत 300 रुपयांना स्वस्त सिलिंडर मिळाल्याने तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो.

जाणून घ्या स्वस्तात सिलेंडर का मिळतोय?
कंपोझिट सिलिंडरचे वजन सामान्य सिलिंडरपेक्षा कमी असते. यामध्ये तुम्हाला 10 किलो गॅस मिळतो. त्यामुळे त्याची किंमत कमी आहे. या सिलेंडरची खास गोष्ट म्हणजे ते पारदर्शक आहेत. सध्या हे सिलिंडर २८ हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहेत. कंपनी हे सिलिंडर इतर शहरांमध्येही उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. त्याच वेळी, इंडेनच्या या सिलेंडरला स्मार्ट सिलेंडर असेही म्हणतात.

या सिलेंडरचे खास वैशिष्ट्य
या सिलिंडरमध्ये एक विशेष सुविधा देण्यात आली आहे ज्यामुळे सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे आणि किती गॅस वापरला गेला आहे हे कळेल. अशा परिस्थितीत गॅस एजन्सी तुम्हाला कमी गॅस देऊ शकत नाही. नवीन कनेक्शन घेताना कोणतीही व्यक्ती कंपोझिट सिलेंडर घेऊ शकते. एवढेच नाही तर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सामान्य सिलिंडरवरून कंपोझिट सिलिंडरमध्ये शिफ्ट करू शकता. तुम्हाला सामान्य सिलेंडर परत करावे लागेल आणि त्या बदल्यात तुम्हाला नवीन संमिश्र सिलिंडर दिले जाईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.