⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | आम्ही काय येथेXXXX….; मंत्री महाजनांसमोर रक्षा खडसे व पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, VIDEO व्हायरल

आम्ही काय येथेXXXX….; मंत्री महाजनांसमोर रक्षा खडसे व पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, VIDEO व्हायरल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसेंना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. मात्र यावरून नाराजीनाट्याचा प्रकार समोर आलाय. रक्षा खडसे यांना पुन्हा तिकीट दिल्यामुळे वरणगाव मध्ये 200 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र भाजप कार्यकर्ते व रक्षाताई खडसेंमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या खंडाजंगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

असा झाला वाद
नाराज पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच रक्षा खडसे यांना खडेबोल सुनावले. व्हिडिओत कार्यकर्ते म्हणतात, आम्ही मतदान भाजपलाच करु. १०१ टक्के कमळ निवडून येणार आहे. परंतु कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. रक्षा खडसे भाजप कार्यकर्त्यांऐवजी सुधाकर जावळे यांना घेऊन बसतात…. आम्ही काय येथेXXXX…. भाऊ समोर जोरात बोलू नका….. शपथ घेऊन सांगा गाडीत भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीचे कार्यकर्ते….

तुम्ही एकनाथ खडसे यांचे नाव घेतात, पण गिरीश महाजन यांचे नाव घेत नाही?…. अशा आरोपांचा भडीमार भाजप कार्यकर्ते रक्षा खडसे यांच्यावर करताना व्हिडिओत दिसत आहेत. कार्यकर्ते आणि रक्षा खडसे यांच्यात खडजंगी सुरु असताना गिरीश महाजन कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/982205386662493/
author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.