जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२५ । एप्रिल महिन्याचे २१ दिवस उलटून गेले तरी अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता जमा झाला नाहीय. एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, आता एप्रिलच्या हप्त्याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी (Aditi Tatkare) महत्त्वाची माहिती दिली आहे.

महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर म्हणजेच 30 एप्रिल रोजी मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेचा सण लाडक्या बहिणींसाठी गोड होणार आहे. मात्र,एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की कमी होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सध्या लाडकी बहीण योजनेचे नियम बदलणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या सगळ्यावर आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. मला वाटतंय या योजना संदर्भात गैरसमज करून घेतला आहे, अडीच लाखांपेक्षा कमी उत्पादन असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या महिला संजय गांधी निराधार योजनचा लाभ घेतात ते या योजनेसाठी पात्र नाही. ज्या महिला नमो शेतकरी योजेतून लाभ घेतात त्यांना 1000 रुपये लाभ मिळतो, मात्र त्यांना 1500 मिळावे म्हणून लाडक्या बहिण योजकडून त्यांना 500 रुपये लाभ मिळतो हे सर्व शासन निर्णय आहे.२ कोटी ४७ लाख महिला लाभार्थी आहेत, शेवटचा लाभ दिला तेव्हा 2 कोतो 33 लाख महिला होत्या, ज्या महिला पात्र आहेत त्यांना हा लाभ मिळत आहे.