खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्यामुळे महामार्गावर ८० कोटींच्या अंडरपासला मंजुरी

फेब्रुवारी 18, 2026 6:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील तरसोद ते फागणे या विभागात एरंडोल शहरातील कासोदा रस्ता तसेच पारोळा बायपासवरील धरणगाव चौफुली येथे वाहन अंडरपास उभारण्यासाठी ८० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ खासदार स्मिता उदय वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला आहे.

Smitawagh 1

गेल्या काही वर्षांत संबंधित ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि शेतकरी यांच्याकडून तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे लेखी निवेदने देऊन पाठपुरावा केला होता.

Advertisements

सध्या तरसोद–फागणे या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून त्याअंतर्गत अनियमित नागरी कामे योजनेतून एरंडोलच्या कासोदा रस्त्यावर आणि पारोळा बायपासवरील धरणगाव चौफुली येथे वाहन अंडरपास उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Advertisements

या प्रकल्पामुळे वाहतूक अधिक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल. स्थानिक व्यापार, शेतीमालाची ने-आण आणि दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होऊन परिसराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य मंत्रिमंडळ सदस्य गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव मतदारसंघातील रस्ते व पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळत असल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी नमूद केले. जनतेच्या समस्या सोडविणे आणि विकासकामांना प्राधान्य देणे हे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now