डॉ. केतकी पाटील निर्मित संविधान@७५ दिनदर्शिकेचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंकडून कौतुक
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव – भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी ताई पाटील (Ketki Patil) यांनी आज मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील कोथळी (Kothali) येथील निवास्थानी जाऊन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना.रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची भेट घेतली. या प्रसंगी संविधानाला अनुसरून तयार केलेली संविधान@७५ दिनदर्शिका डॉ केतकी पाटील यांनी ना. खडसे यांना भेट दिली. या प्रसंगी दिनदर्शिकेचे अवलोकन करून अभ्यास पूर्ण दिनदर्शिका निर्मितीबाबत डॉ केतकी पाटील यांचे अभिनंदन केले.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हे वर्ष संविधान पर्व असल्याचे सांगितले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी घर घर संविधान असे विधान केले आहे. भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील यांनी संविधान दिनदर्शिका तयार केली असून त्याचे वितरण सुरु झाले आहे.
आज मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना रक्षा ताई खडसे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आल्याने सकाळी डॉ केतकी पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी दिनदर्शिकेत अंतर्भूत बाबींची माहिती देण्यात आली. दिनदर्शिकेची पाहणी करीत सर्वसामान्यांना समजेल अशा साध्या सरळ भाषेत संविधान मांडले आहे. या बद्दल ना खडसेंनी समाधान व्यक्त केले. तसेच दिल्लीत देखील दिनदर्शिका घेऊन जाणार असे आश्वासन ना रक्षा ताई खडसे यांनी डॉ केतकी पाटील यांना दिले.