जळगाव न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । राज्यातील भारतीय पोलीस सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने जाहीर केल्या आहेत. नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षकपदी पुणे मोटार परिवहन विभागाचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांची वर्णी लागली आहे. विद्यमान महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर हे जळगाव जिल्ह्यात आलेले असताना बदलीचे आदेश झाले आहेत.
राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या असून गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी बदल्यांचे परिपत्रक जाहीर केले आहेत. काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही अधिकाऱ्यांची पदस्थाना करण्यात आली आहे.
नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पुणे मोटार परिवहन विभागाचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर हे वार्षिक तपासणीकामी जिल्ह्यात आलेले आहेत. त्यातच बदलीचे आदेश झाले असून नवीन महानिरीक्षक म्हणून सुनील फुलारी यांची वर्णी लागली आहे.