जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथे सोशल क्रिटिकल केअर मेडिकलच्या नूतन पदाधिकार्यांच्या पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. दरम्यान यावेळी डॉ. द्रविड यांनी आयोजित चचासत्रात मार्गदर्शन केले.
या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी समूहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे उपस्थित होते. यावेळी जुन्या पदाधिकार्यांकडून नवीन पदाधिकार्यांना बॅच देऊन पदभार सोपविण्यात आला. या कार्यक्रमानंतर पुण्यावरून आलेले डॉ.अनिल द्रविड आणि डॉ.पियुष चौधरी यांच्या कडून सिम्बॉल्सिस ऑन इन्फेक्शन्स डीसीस या विषयावर चर्चासत्र झाले. होणार आहे.
यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर आयएमएचे चेअरमन डॉ.सुनील गाजरे, व्हाईस चेअरमन डॉ. शशिकांत गाजरे,आयएमएच्या सेक्रेटरी डॉ. अनिता भोळे, जळगाव यएससीसीएम चेअरपर्सन डॉ.राजेश दाबी, डॉ.पराग चौधरी, डॉ.राहुल महाजन, डॉ.रवींद्र पाटील, डॉ.धर्मेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.