Jalgaon : अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी बनविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२५ । राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ घेणे शेतक-यांना देणे सुलभ व्हावे, याकरीता केंद्र शासनामार्फत अॅग्रिस्टॅक (Agristack) (Digital Public Infrastructure for Agriculture) योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
भुसावळ तालुक्यात अॅग्रिस्टॅक या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक व सेवा केंद्र चालक यांची भुसावळ तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्या कार्यालय येथे बैठक घेऊन प्रशिक्षण वर्ग अयोजीत करण्यात आला होता.
या योजनेअंतर्गत शेतकरी खातेदार यांना फार्मर आयडी प्राप्त होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होणार आहे त्यांना शासनाकडुन विवीध योजनेचा लाभ जलदगतीने मिळणार आहे. जसे पि.एम. किसान सन्मान योजना, पिक विमा योजना, पिक कर्ज, नुकसान भरपाई अनुदान DBT दवारे वाटप, हवामान डेटा, मृदा आरोग्य माहिती पिकाबदददल सल्ला तसेच शासनाच्या विविध योजनांच्या लाभाचा यात सामावेश आहे.
सर्व शेतकरी यांनी फार्मर आयडी तयार करुन घ्यावी असे आवाहन भुसावळचे तहसिलदार यांच्याकडुन करण्यात आले आहे. भुसावळ तालुक्यात एकुण २५४०० खातेदार यांची फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. फार्मर आयडी करण्याकरिता गावातील तलाठी, महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायत संग्राम केंद्र, CSC चालक यांच्याकडून शेतकरी यांची नोंदणी करुन घ्यावी. या योजनेत नोंदणी करण्याकरीता केवळ आधारकार्ड व आधारकार्डशी संलग्नीत मोबाईल क्रमांक शेतकरी आवश्यक आहे. आज दिनांक २१ जानेवारी पासुन कॅम्पमोड वर सर्व गावात विशेष शिबीरे आयोजीत करण्यात आलेली असुन सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भुसावळ तहसिलदार यांनी केले आहे.