जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयात गेल्या ८ दिवसापासून सूरू असलेल्या फिजिओफीस्ट २ के २५ समारोप उत्साहात करण्यात आला.


दि ५ रोजी डी.जे, दि ७ रोजी डीआयवाय डे,यात टाकावू पासून टीकावू वस्तू तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. विजेते मी. डीआयवाय हारीस शेख,मिस डीआयवायआश्लेषा विरशीद, सर्जनशिल म्हणून एजाजखान, आकांशा कोळी तर बेस्ट बॅच म्हणून भूतीय बॅचला पुरस्कार देण्यात आले.दि ८ रोजी व्टीनींग डे यात रॅम्प वॉक,पोशाख परिधान करण्यात आले अर्थव कुळकर्णी, श्वाश्वत नाफडे, अदिती गाते, धनश्री साळी, मिस्बाह उरूज, बुशरा खान,धनश्री वानखेडे, उत्कर्षा ताले, सर्वेश पाटील, आणि पूजा पुरोहीत विजेते ठरले.दि ९ रोजी डीनर डीप्लोमसी, तर शेवटच्या विविध सांस्कुतिक कार्यक्रमाची मेजवानी फिजिओफिस्ट २ के २५ चे उदघाटन ऑनलाईन पध्दतीने उपस्थीत देत संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या उपस्थीतीत संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शारदा पूजनाने करण्यात आले.
यावेळी सदस्य हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके,प्रशासकिय अधिकारी प्रमोद भिरुड,फिजिओथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नगुलकर,डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के मिश्रा, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्य विशाखा गणविर, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महा व रिसर्च सेंटरचे अधिष्टाता डॉ.हर्षल बोरोले, डॉ. केतकी पाटील स्कुल ऑफ नर्सिंगचे संचालक डॉ. शिवानंद बिरादर,फिजिओथेरेपीचे प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, गोदावरी नर्सिंगचे प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे इ मान्यवर उपस्थीत होते.
जवळपास तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात साथ संगत आणि फिल्मी गितांवर गायन,वादन नृत्य कलेसह नाटीका सादर करीत उपस्थीतांची मने जिंकली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अंतरा भिरूड, खगेंद्र सपकाळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी फिजिओथेरेपीचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारोह पार पडला तर समारोप राष्ट्र गिताने करण्यात आला.