---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

राष्ट्रवादीकडून जिल्हा प्रभारींच्या नावाची घोषणा ; नाथाभाऊंवर ‘या’ चार जिल्ह्यांची जबाबदारी..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२३ । आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून (NCP) जिल्हा प्रभारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात जळगाव (Jalgaon), धुळे (Dhule), नंदुरबारसह (Nandurbar) बुलढाणाची (Buldhana) जबाबदारी माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

khadse jpg webp

राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून आगामी २०२४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी २१ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेने व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील (Jayant patil) यांनी राज्यभरातील जिल्हा प्रभारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

---Advertisement---

जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने जिल्हा प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये अनिल देशमुख यांच्याकडे अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, एकनाथ खडसे यांच्याकडे जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, राजेश टोपे यांच्याकडे औरंगाबाद , परभणी, जालना, लातूर, धाराशिव तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ठाण्यासह बीडची जबाबदारी देण्यात आली आहे. बाळासाहेब पाटील यांच्याकडे सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, प्राजक्त तनपुरे यांच्याकडे नाशिक, अहमदनगर, अशोक पवार यांच्याकडे पुणे, रोहित पवार यांच्याकडे रायगड, भंडारा, गोंदिया आणि सुनिल भुसारा यांच्याकडे पालघर, हिंगोली, नांदेड, गडचिरोली या जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---