जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२५ । गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, तर फक्त नगरपरिषद आणि नगर पंचायतीसंदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे.निवडणुका जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेत निवडणुकांची घोषणा केली.

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, नगर परिषद आणि नगर पंचायती संबंधित माहीती देणार आहोत. 246 नगर परिषदांमध्ये 10 नवीन नगर परिषद समावेश आहे. 42 नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार आहे. 15 नवनिर्मित नगरपंचायती आहेत. नगर परिषदची निवडणूक बहुसदस्य पद्धतीने 288 अध्यक्ष निवडले जाणार आहेत. नगर परिषदेच्या एक वार्डमध्ये दोन किंवा 3 जागा असणार आहेत. या निवडणुकीसाठी 1 कोटी 7 लाख 30 हजार 576 एवढे मतदार असणार आहेत. निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सद्वारे होणार आहे, असे ते म्हणाले.
कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?
अर्ज दाखल १० नोव्हेंबर
अंतिम तारीख १७ नोव्हेंबर
छाननी – १८ नोव्हेंबर
माघारी घेण्याची मुदत – २५ नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह नेमूण देणं – २६ नोव्हेंबर
मतदान – २ डिसेंबर २०२५
मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५

