---Advertisement---
जळगाव जिल्हा

लम्पीच्या पार्श्वभूमीवर बैल पोळा गोठ्यातच साजरा करा ; पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गाय व बैल या जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज या साथ रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या साजरा केला जाणारा बैल पोळा सण पशुपालकांनी सार्वजनिकरित्या मिरवणूक काढून साजरा न करता बैलांची गोठ्यातच पूजा करून साजरा करावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्यामकांत पाटील यांनी केले आहे.

pola jpg webp

पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पीवर उपचार व प्रतिबंधात्मक उपाय व्यापक प्रमाणावर राबविण्यात येत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात लम्पीमुळे बैल मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जवळपास ६० टक्के असल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बैलपोळा पशुपालकाच्या जिव्हाळयाचा सण आहे. मात्र आपल्या बैलाचे लम्पी स्कीन या संसर्ग आजारापासून संरक्षण व्हावे, आजाराची लक्षणे होवू नये यासाठी पशुपालकांनी पोळा हा सण सार्वजनिकरित्या मिरवणूक काढून साजरा न करता बैलांची पुजा गोठयातच करून साजरा करावा.

---Advertisement---

जनावरांमध्ये लम्पी सदृश लक्षणे दिसून आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. लम्पी स्किन आजार जरी संसर्गजन्य असला तरी रोगाचे लवकर निदान झाल्यास व योग्य उपचार त्वरीत सुरू केल्यास आजार ८ ते १० दिवसात बरा होतो. सद्यस्थितीत जळगाव जिल्हयात उपचाराअंती आजार बरा होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाता शासकीय यंत्रणे मार्फत उपचार करून घ्यावे. त्यासोबतच जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सहकार्याने गोठा स्वच्छता व गोचिड निर्मूलन करून घ्यावे.असे आवाहन ही श्री पाटील यांनी केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---