⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | महाराष्ट्र | उद्धवजींना असेच भXXX… ; सत्तारांनंतर आता शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याची जीभ घसरली

उद्धवजींना असेच भXXX… ; सत्तारांनंतर आता शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याची जीभ घसरली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवीगाळ केल्याचं प्रकरण ताजे असताना, आता शिंदे गटाच्या आणखी एका नेत्याची जीभ घसरली आहे. शिंदे गटातील नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार तसेच माजी परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली.

अनिल परब यांना उद्धव ठाकरे यांचे दलाल म्हणताना, रामदास कदमांनी शिवीगाळही केली आहे. उद्धव ठाकरे यांना असेच दलाल सोबत लागतात, असं रामदास कदम म्हणाले आहेत. पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, ‘उद्धवजींना असेच भ*** सोबत लागतात. मग ते अनिल परब असो, की विनायक राऊत असो. त्यांना अशीच दोन-चार माणसे लागतात. अशा *** जोपर्यंत उद्धव ठाकरे हे बाजूला करत नाही, तोपर्यंत त्यांच्या पक्षाचं काहीही होणार नाही’, अशा शब्दात रामदास कदम यांनी शिवीगाळ केली आहे.  त्यामुळे आता या वक्तव्याने ठाकरे गटाचे नेते काय उत्तर देतात हे पाहणे गरजेचे आहे.

रामदास कदम यांनी आज रत्नागिरीत पत्रकारपरिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनिल परब यांच्यावर आरोप देखील केले आहे. “अनिल परब यांनी शिवसेनेच्या ताब्यात असलेली दापोली मंडलगड नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घातली. परब यांनी माझ्या योगेशदादावर अन्याय करून त्यांना बाजूला ठेऊन ही नगरपरिषद राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचं काम केलं. इतकंच नाही, तर अनिल परब यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे”, असा आरोपही रामदास कदम यांनी केला.

दरम्यान, काल अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. त्यामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. तर सत्तार यांचे पुतळे जाळण्यात आले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.