⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

Andrew Symonds : अँड्र्यू सायमन्ड्सचा कार अपघातात मृत्यू, क्रीडा जगताला धक्का

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । क्रीडा जगतातून रविवारी सकाळी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला. सायमंड्स यांच्या वयाच्या ४६ व्या वर्षी अचानक निधन झाल्याच्या बातमीने क्रीडा जगताला धक्का बसला आहे.

अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री टाऊन्सविले येथे कार अपघातात मृत्यू झाला. क्वीन्सलँड पोलिसांनी सांगितले की, शहराच्या पश्चिमेला सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये रात्री 10:30 च्या सुमारास अपघात झाला. प्राथमिक तपासात भरधाव वेगात असलेली कार रस्त्यावर उलटल्याचे समोर आले आहे. सायमंड्सला वाचवण्याचे प्रयत्न झाले, पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.

विशेष म्हणजे सायमंड्सची कारकीर्द चमकदार होती. त्याने 198 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5088 धावा केल्या आहेत. यादरम्यान सायमंड्सने 6 शतके आणि 30 अर्धशतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये अष्टपैलू कामगिरी करताना त्याने 133 विकेट्सही घेतल्या आहेत. त्‍याच्‍या नावावर 26 कसोटीमध्‍ये 1462 धावा आहेत तसेच 24 विकेटही आहेत. सायमंड्सने 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. देशांतर्गत सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.