जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । शहरातील प्र.क्र. १२ मधील एम.जे. कॉलेज परिसरातील तसेच रामदास कॉलनी ओपन स्पेस लगतच्या नाल्याच्या संरक्षण भिंतीसाठी गेल्या पंचवार्षिकला पाठपुरावा करून निधी उपलब्ध करुन घेतला होता. परंतु संबंधीत मक्तेदार यांनी सदर काम पूर्ण करण्यास सुमारे ३ वर्षांचा काळ लावला. तरी देखील अतिशय निकृष्ट दर्जाचे काम याठिकाणी झाल्याचे सिध्द होत आहे, अशी तक्रार मनपा शिवसेनेचे गटनेते अनंत (बंटी) जोशी यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

काय म्हटले आहे निवेदनात?
शहरातील रामदास कॉलनी ओपन स्पेस जवळील संरक्षण भिंतीचे बांधकाम पूर्ण झाल्याच्या महिन्याभरातच दि. १३/०७/२०२१ रोजी ढासळलेली असून याबाबता माध्यमातुन देखिल बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहे. तसेच परिसरातील नागरीक महानगरपालिकेविषयी प्रचंड रोष व्यक्त करत आहेत. जळगाव शहर मनपात मुळात निधी उपलब्धता नसते, आर्थिक स्थिती बिकट असल्याने प्राप्त निधीचा सुयोग्य वापर करणे अपेक्षित व गरजेचे आहे.
कामाची गुणवत्ता व दर्जा टिकविणे प्रशासनाची जबाबदारी आहे. लोक प्रतिनिधी म्हणून मी काम सुरु असतांनाच संबंधीत कामाबद्दल वारंवार संबंधित अभियंता यांना सचेत केलेले होते. तरी देखिल अक्षम्य असा हलगर्जीपणा याठिकाणी झाल्याचे दिसून येत आहे.
तरी मी आपणास विनंती करीतो की, या प्रकाराची तातडीने सखोल व परिपूर्ण चौकशी करुन जबाबदार अधिकारी तसेच मक्तेदार यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच सदरह काम निविदेतील अटी शर्ती, मानके प्रमाण झालेले आहे किंवा नाही मटेरियल टेस्टींग अहवाल देणान्या एजन्सी मार्फत पुनंतपासणी करण्यात यावी कारण माझ्या माहिती प्रमाणे संबंधीत मक्तेदार यांनी अतिशय निकृष्ठ दर्जाचे काम केलेले आहे. तरी संबंधीत मक्तेदार यांचे देव्यक अदा कर नये व मक्तेदार यांचे नांव काळ्या यादीत टाकण्यात यावे जेणे करून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, असेही अनंत जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.