⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची चर्चा, बॉलीवूडसह आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींची उपस्थिती…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज |30 मे 2024| सोशल मीडियावर सध्या जोरदार सुरू असलेली चर्चा ती म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याची .१ ते ३मार्च रोजी गुजरात येथील जामनगर येथे झालेल्या अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यानंतर,आता दुसरा प्री-वेडिंग सोहळा हा २८ मे ते १ जून पर्यंत इटली येथे एका आलिशान अशा क्रुझरपार पडणार आहे.

या सोहळ्यासाठी बॉलीवूड पासून ते आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी ची उपस्थिती या सोहळ्याला असणार आहे जवळपास ८०० पाहुणे या प्री-वेडिंग फंक्शन साठी उपस्थित राहणार असल्याची देखील चर्चा आहे.
अनंत आणि राधिका यांचा हा दुसरा प्री-वेडिंग सोहळा क्रूजर पार पडणार असून, इटली ते फ्रान्स असे या ग्रुपचे मार्गक्रमण असणार आहे. मागील काही दिवसांपासून अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी हे इडली साठी रवाना झाले होते.
यामध्ये रणवीर सिंग,रणवीर कपूर, आलिया भट, महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारा ऑरी व यासोबत अनेक असे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी देखील एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. त्याशिवाय अंबानी व मर्चंट कुटुंबातील सदस्य देखील रवाना झाले होते. बहुचर्चित असलेला ओरी याने या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याचा क्रूज वरील दोन-तीन फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये आलिशान असे क्रूस पाहायला मिळत आहे क्रूज मधील सुंदर निसर्गास दर्शन होत आहे समुद्राच्या लाटा तसेच मावळता सूर्य अप्रतिम असं दृश्य त्या फोटोंमध्ये दिसत आहे.


या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याचे कान्स-फ्रान्स, रोम,पोर्टनोफिनो अशा ठिकाणी जोरदार सेलिब्रेशन असणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार इटली वरून ही क्रूज पुढे जाईल तेव्हा पाहुण्यांचे या ठिकाणी स्वागत हे वेलकम लंचने होईल, त्यानंतर सायंकाळी इव्हिनिंग पार्टी असेल दुसऱ्या दिवशी क्रूज रुमच्या दिशेने रवाना होईल. टोगा पार्टीचे आयोजन या ठिकाणी केले जाईल ,कान्स येथे ब्लॅक टाय इव्हेंट चे आयोजन अंबानी कुटुंबीयांतर्फे असेल, १ जूनला क्रूज शीप ही पोर्टनोफिनो इटलीला रवाना होईल अशी माहिती समोर आली आहे.