---Advertisement---
बोदवड राजकारण

बोदवडला फडकला भगवा : नगराध्यक्षपदी आनंदा पाटील, शिवसेनेचा जल्लोष

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । बोदवड नगरपंचायत निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर शुक्रवारी शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आज झालेल्‍या नगराध्यक्ष पदासाठीच्‍या निवडणूकीत शिवसेना उमेदवार आनंदा पाटील हे विजयी झाले आहेत. त्‍यांच्‍या निवडीनंतर शिवसेनेतर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत जल्‍लोष करण्यात आला.

bodwad jallosh

बोदवड नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीला बहुमताचा आकडा पार करता आला नव्हता. राष्ट्रवादीने अवघ्या सात जागा राखल्याने शिवसेनेचा नगराध्‍यक्ष नक्‍की होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून योगिता खेवलकर यांनी केवळ विरोध म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने तर सहाय्यक नगरपंचायत मुख्याधिकारी आकाश डोईफडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. स्पष्ट बहुमत असल्याने शिवसेनेचे गटनेते आनंदा पाटील यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

---Advertisement---

नगराध्‍यक्ष पदाच्‍या निवडणूकीत आनंदा पाटील यांना १७ पैकी शिवसेनेचे ९ व भाजपचे १ अशी १० मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या योगिता खेवलकर यांना राष्ट्रवादीचे ७ मते मिळल्‍याने त्‍यांचा पराभव झाला. तसेच उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या रेखा गायकवाड यांना देखील 10 मते मिळवत विजय मिळवला. तर राष्ट्रवादीचे मुज्जमिल शहा यांना ७ मते मिळवत पराभव स्वीकारावा लागला. पहिल्यांदाच पार पडलेल्या बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. महाविकास आघाडीतील घटक असलेले शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत या निवडणुकीत पाहायला मिळाली होती.

नगराध्यक्ष निवडणुकीसाठी आ.चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. चारचाकी वाहनांचा मोठा ताफा घेऊन आ.चंद्रकांत पाटील हे बोदवडला दाखल झाले होते. निवडीनंतर जोरदार जल्लोष करीत विजयाचा गुलाल उधळण्यात आला. बोदवड शहरातून जंगी विजयी मिरवणूक काढून शिवसैनिकांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---