⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

माझे लग्न असल्याचे सांगत लांबविली अंगठी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २२ एप्रिल २०२२ । तुमच्या हातातील अंगठी सारखी अंगठी मला बनवायची असल्याचे सांगून २१ हजाराची सोन्याची अंगठी एकाने लांबविल्याची घटना पारोळा शहरात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरभान भिकन पाटील (वय-४७) रा. जोगलखेडा ता. पारोळा हे दि १० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास पारोळा नगरपालिका चौकात आले होते. चौकात भाजीपाला घेत असताना त्याठिकाणी अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ येत म्हणाला की, मी तुम्हाला चांगला ओळखतो, माझे लग्न आहे, मला तुमच्या बोटातील अंगठी सारखी अंगठी बनवायची आहे, तुम्ही मला अंगठी काढून दाखवा. त्यानुसार विरभान पाटील यांनी अंगठी काढून दिली त्यावर मी सोनाराला दाखवून देतो असे सांगून तो अंगठी घेऊन निघून गेला. बराच वेळ झाला तो परत आला नाही. म्हणून आपली फसवणूक झाल्याचे त्यांना लक्षात आले. याबाबत विरभान पाटील यांनी ११ दिवसानंतर पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक योगेश जाधव हे करीत आहेत.