जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ओक्टोबर २०२२ । वाढती महागाई काही पाठ सोडत नाहीय. दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. अशातच आता दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. अमूलने दुधाच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. कंपनीने लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. फुल क्रीम दूध आता ६१ ऐवजी ६३ रुपये प्रतिलिटर झाले आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. यापूर्वी 17 ऑगस्टपासून अमूल दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
गुजरात वगळता देशभरात दर वाढले
कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की त्यांनी आपले फुल क्रीम दूध आणि म्हशीच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. दुधाच्या दरात ही वाढ गुजरात वगळता सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी करण्यात आली आहे. अमूलने तिसऱ्यांदा अशाप्रकारे दुधाच्या दरात वाढ केली आहे. मात्र, दुधाच्या दरवाढीबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
याआधी दुधाचे भाव कधी वाढले?
अमूल आणि मदर डेअरीने याआधी ऑगस्टमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर दरवाढीची भरपाई देण्याच्या नावाखाली दुधाच्या दरात वाढ करण्यात आली. यापूर्वी मार्च महिन्यात दुधाचे दर वाढले होते. आज पुन्हा भाव वाढले आहेत. सणांच्या आधी हा निर्णय सर्वसामान्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. देशातील सर्वाधिक खाल्ल्या जाणार्या खाद्यपदार्थांपैकी दूध हे एक आहे. त्याचबरोबर या दरवाढीमुळे लोकांच्या बजेटवर परिणाम होणार असल्याचेही बोलले जात आहे.