जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२५ । जळगाव आणि भुसावळ मार्गे तब्बल १३० किलोमीटर प्रतितास वेग असलेली देशातील अमृत भारत रेल्वे शुक्रवार २५ रोजी धावली. मात्र पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही गाडी स्वागताविनाच भुसावळहून पुढच्या मार्गाला धावली .

ट्रेन क्र. ०५५९५ सहरसा (बिहार) ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) यादरम्यान ही ट्रेन धावली. विशेष या गाडीला भुसावळ आणि जळगाव स्थानकांवर थांबा आहे. देशातील पहिली अमृत भारत रेल्वे भुसावळ स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजून ५५ मिनिटाला फलाट क्र. ५ वर पोहोचली आणि संध्याकाळी ६:१० वाजता रवाना झाली.
या गाडीच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली होती, मात्र पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे रेल्वे प्रशासनाने गाडीचे स्वागत करणे टाळले. यावेळेस अधिकारी स्थानकावर उपस्थित होते. गाडीला २२ डबे आहेत. गाडीच्या दोन्ही टोकांवर इंजिन लावल्यामुळे पारंपरिक गाड्यांच्या तुलनेत या गाडीला अधिक वेग आहे. यामुळे पूर्वीच्या तुलनेत प्रवासाचा कालावधी कमी झाला आहे. वंदे भारत रेल्वेप्रमाणेच या गाडीतही आरामदायी सीटची व्यवस्था असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
अमृत भारत एक्सप्रेस कुठे कुठे थांबणार ?
ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपुर, प्रयागराज छिवकी, मिर्जापुर, पं.दीन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपुत्र, सोनपुर, हाजीपुर जंक्शन, मुज़फ्फरपुर, समस्तीपुर, हसनपुर रोड, सलौना आणि खगड़िया जंक्शन