---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

वेश बदलून देवेंद्र फडणवीस शिंदेंना भेटायला जायचे ; अमृता फडणवीसांनी सांगितला घरातला किस्सा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसोबत बंड पुकारला होता. यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं होते. त्यांनतर राज्यात नवीन सरकार स्थापन झालं आहे. अश्यात देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रिपद मिळणार नाही आणि ते उपमुख्यमंत्री होतील, हे आपल्याला आधीपासूनच माहिती असल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सांगितलं आहे.तसेच राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना रात्री गुपचूप भेटायला जात होते, असा खुलासाही अमृता फडणवीस यांनी केला.

shinde fadanvis jpg webp

“वेश बदलून भेटी व्हायच्या”
विधीमंडळात बोलताना एकनाथ शिंदे यांनी रात्री उशीरा देवेंद्र फडणवीसांसोबत गाठीभेटी व्हायच्या. कुणी उठायच्या आत आम्ही आपापल्या घरी असायचो, असं सांगितलं. त्यांच्या या विधाना अमृता फडणवीसा यांनी दुजोरा दिला आहे. “देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेना भेटायला जायचे. हुडी आणि गॉगल घातला की ते मलाही ओळखू यायचे नाही”, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

---Advertisement---

दरम्यान, ”मला माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, तसेच कोणतंही पद स्वीकरणार नाहीत. उलट मला याबाबत मला गर्व वाटत होता. त्यांनी त्यांनी दाखवून दिलं की पदापेक्षा ते महाराष्ट्राचं हित पाहतात. त्यांनी हसतमुखाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं. याचा मला अभिमान आहे. कारण देवेंद्रजी नेहमी पदाच्या पलिकडे जात जनतेच्या हिताची कामं करतात”, असं अमृता म्हणाल्या आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---