अमृता फडणवीसांचं नवं गाणं रीलीज! VIDEO एकदा बघाच..

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२३ । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नुकतेच नवीन गाणे रिलीज झाले आहे. ‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!’ असे या गाण्याचे बोल असून सध्या ते सोशल मीडियावर तुफान हिट झालं आहे. अवघ्या काही तासांत या व्हिडिओ साँगला जवळपास पावणेतीन लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अमृता फडणवीस या बँकर असून, त्या गायिकाही आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली असून, त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. या गाण्यांनी प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं आहे. आता त्यांचं नवं गाणं प्रदर्शित झाले आहे. ‘आज मैं मूड बणा ले या…’ असे या गाण्याचे बोल आहेत. अमृता यांनी या म्युझिक व्हिडिओमध्ये डान्सही केला आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

पहा व्हिडीओ..!