‘अमृत भारत’ ट्रेन सर्वसामान्यांसाठी कशी आहे? काय आहे खासियत, जाणून घ्या
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२३ । भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने काम करत असून देशातील सर्व शहरे सेमी हायस्पीड ट्रेनने जोडल्यानंतर आता अमृत भारत ट्रेन चालवण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, येत्या शनिवारी म्हणजेच 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतून 7 ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. त्यापैकी 2 गाड्या अमृत भारत असतील.
पहिली ‘अमृत भारत ट्रेन’ अयोध्या ते दरभंगा दरम्यान सुरू केली जाईल.तर दुसरी हावडा ते बेंगळुरू सुरु केली जाणार आहे. या गाड्यांना सर्वसामान्यांचे वंदे भारत म्हटले जात आहे. ही संपूर्ण ट्रेन भारतात बनवली आहे. आत्मनिर्भर भारताचे हे उदाहरण आहे. अमृत भारत ट्रेनमध्ये मिक्स कोच बसवण्यात आले आहेत. यामध्ये स्टाइलसोबत कम्फर्टचाही विचार करण्यात आला आहे. ट्रेनला एलएचबी कोच आहेत त्यामुळे धक्के कमी होतात.
ही एक पुश-पुल ट्रेन आहे. याचा अर्थ असा आहे की यात पुढील आणि मागील दोन्ही बाजूस इंजिन आहेत, यामध्ये एक इंजिन समोरून खेचते आणि दुसरे मागून ढकलते.यामुळेच या ट्रेनचा वेग अतिशय वेगवान आहे. या ट्रेनमध्ये मोबाईल चार्जर, होल्डर आणि पब्लिक डिस्प्ले सिस्टीम बसवण्यात आली आहे. संपूर्ण ट्रेनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.
एक अमृत भारत ट्रेन दिल्ली ते दरभंगा आणि दुसरी हावडा ते बेंगळुरू. विशेष म्हणजे दरभंगाला जाणारी ट्रेन अयोध्येतून सुरू होणार आहे. ती दिल्लीहून दरभंगामार्गे अयोध्येला जाईल.30 डिसेंबर रोजी ही ट्रेन विशेष धावणार आहे. त्या दिवशी ही ट्रेन अयोध्येहून दरभंगाला जाईल. त्याची पहिली रन 30 डिसेंबर रोजी होईल, जी अयोध्या ते दरभंगा असेल. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही ट्रेन नियमित धावणार आहे.
.या ट्रेनचा कमाल वेग ताशी 130 किलोमीटर आहे. ही राजधानी एक्सप्रेसच्या बरोबरीची आहे. या ट्रेनमध्ये एकूण 22 डबे बसवण्यात येणार आहेत. हायटेक टॉयलेट, मोबाईल चार्जिंग, ऑटोमॅटिक दरवाजे आणि अत्याधुनिक खिडक्या आणि दरवाजे ही त्याची खासियत आहे.