---Advertisement---
जळगाव जिल्हा बोदवड

बोगस प्रमाणपत्र घेतलेल्यांमध्ये आठ ‘लसवंत’, संशयितांची नावे कमी होणार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । बोदवड येथील लस न घेता लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून ४५ आराेपींमध्ये ७ ते ८ जणांनी लस घेतल्याचे स्पष्ट हाेत आहे. त्यामुळे आराेपींची संख्या ४५ वरून ३८ वर येऊ शकते. यासह इतरही प्रश्न उपस्थित झाले असून पाेलिस तपासाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

bogas lasvant jpg webp

शहरात ३१ डिसेंबर रोजी दत्त काॅलनी, उर्दू शाळा या परिसरात एणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कपिल पवार, डॉ.संदीप जैन यांनी पथकासह लसीकरण मोहीम राबवली. अवघ्या दोन तासांत ९८ जणांना लस देण्यात आली. त्याची ऑनलाइन नोंदही करण्यात आली. परंतु नंतर ऑनलाइन तपासणी केली. असता शासकीय पोर्टल वर १४४ जणांनी लस घेतल्याचे दिसून आले. यावर डेटा ऑपरेटरसोबत चर्चा करून आशा सेविका दस्तऐवज तपासून ४५ नागरिकांना लस न घेता प्रमाणपत्र घेतलेल्यांना पोलिस स्थानकात आरोपी करण्यात आले आहे. मात्र, या आरोपीच्या यादीत ज्यांनी लस घेतली अशा सात जणांची नावेही आरोपींच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यांची नावे जर कमी झाली तर आरोपींची संख्या ३८ राहते. मग आरोग्य विभागाने आरोपींचा ४५ ही संख्या कशावरून ठरवली, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

---Advertisement---

लस देताना आरोग्य सेवक व आशा सेविका यांना लस दिल्यावर ऑनलाइन प्रक्रिया करण्यासह लस घेणाऱ्याची नाव नाेंदणी करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर मिळाली. मग पासवर्ड चोरणाऱ्या व्यक्ती अथवा आरोपीला पासवर्ड एवढ्या लवकर कसा हाताळता आला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---