---Advertisement---
जळगाव जिल्हा

उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२४ । पाचोरा येथील पाचोरा व भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख युवा नेते अमोल शिंदे यांना लोकमत तर्फे “लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ खानदेश” या पुरस्काराने गौरवण्यात आले. आज दिनांक 3 ऑक्टोंबर 2024 गुरुवार रोजी कोल्हे हिल्स येथील एका दिमाखदार समारंभात ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबभाऊ पाटील, यांच्या हस्ते अमोल शिंदे यांना “लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ खानदेश” हा पुरस्कार देण्यात आला.

amol shinde

याप्रसंगी व्यासपीठावर खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, धुळे येथील आमदार अमरीश भाई पटेल, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, लोकमतचे संपादक किरण अग्रवाल उपस्थित होते.

---Advertisement---

या निमित्ताने खानदेशातील निवडक पुरस्कारार्थी नेतृत्वाचा प्रोफाइल असलेले कॉफी टेबल बुक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. खानदेशातील राजकारण आणि समाजकारणात क्रियाशील असलेल्या गुणवंत नेतृत्वांचा सन्मान या सोहळ्याच्या निमित्ताने झाला. लोकमतचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले. लोकमत चे महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी आभार मानले. हा पुरस्कार स्वीकारताना अमोल भाऊ शिंदे यांचे समवेत भडगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील,पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल बापू पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप बापू पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---