⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | ठरलं ! गृहमंत्री अमित शाह ‘या’ तारखेला येणार जळगावात?

ठरलं ! गृहमंत्री अमित शाह ‘या’ तारखेला येणार जळगावात?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२४ । गेल्या काही दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा स्थगित करण्यात आला होता. मात्र आता त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची नवी तारीख समोर आली आहे. भाजपचे नेते अमित शाह 5 मार्चला महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहे.

या दिवशी जळगावमध्ये युवासंमेलनाला अमित शाहा उपस्थित राहणार आहे. तसेच अकोला येथे क्लस्टरच्या बैठकीला शाहा हजर राहणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर शहरात शाहा यांची जाहीर सभा देखील होणार आहे. त्यामुळे अमित शाहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देखील जोरदार तयारी केली जाण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी उद्या यवतमाळच्या दौऱ्यावर…
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे दीड लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहे. या मेळाव्यासाठी भारी परिसरात या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात आहे. या मेळाव्याच्या सभास्थळी 45 एकराच्या विस्तीर्ण जागेवरती सभामंडप उभारण्याचे काम सुरू आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.