⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

मोठी बातमी ! अमित शहांचा जळगाव दौरा रद्द ..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२४ । भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जळगाव दौऱ्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अमित शहा यांचा १५ फेब्रुवारीचा जळगाव दौरा रद्द झाला असल्याची माहिती समोर आलीय.

अमित शहा हे गुरुवारी (ता. १५) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या उपस्थितीत जळगावात युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी जामनेरात बैठक संपन्न झाली होती. परंतु अमित शाह यांचा दौरा रद्द झाला असून या बातमीला जिल्हा प्रशासनाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे. अमित शाह पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र त्यांचा हा दौरा सुद्धा स्थगित झाल्यामुळे आता अमित शहा यांचा पुढील दौरा कधी होतो याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी लाठी आणि अश्रूधुराच्या नळकांड्यासह जवानांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारकडून काळजी घेतली जात आहे. यामुळे अमित शहा यांचा जळगाव रद्द झाल्याचे कळतेय.