जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ । जळगाव- पाचोरा रस्त्यावर आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका व खासगी डाॅक्टर यांची कार तालुक्यातील हडसन गावाजवळ धडकल्याने नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा चालक व कारमधील डॉक्टर पिता-पुत्र जखमी झाले आहेत.
जळगाव येथून पाचोराकडे निघालेल्या डॉ. नंदकिशोर पिंगळे व त्यांचा मुलगा कारने पाचोरा येथे येत असताना नांद्रा गावाच्या पुढे व हडसन गावाच्या ५०० मीटर अंतरावर नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका (एमएच १९/९२५६ ) ही पाचोरा येथून नांद्राकडे येत असताना समोरून येणाऱ्या कारवर धडकली.
या अपघातात अल्टो कार (एमएच१९/एएक्स ५४९४)मधील डॉक्टर पिता-पुत्र जखमी झाले. त्यांना पाचोरा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले तर रुग्णवाहिकाचालक किरण निंबा पाटील यांना तोंडावर मार लागल्याने त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.