---Advertisement---
बातम्या

Amazon चा धमाका! स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉपसह ‘या’ वस्तूंवर मिळेल भरघोस सूट..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२३ । तुम्हीही नवीन स्मार्ट फोन, टीव्ही, फ्रीज, लॅपटॉपसह इतर इलेक्टिक वस्तू घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी स्वस्तात खरेदीची संधी चालून येणार आहे. ई-कॉमर्स कंपन्यानी Amazon लवकरच आपला ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2023 आणणार आहे. सध्या Amazon ने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Festival) सेल 2023 संदर्भात कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.

amazon great festival jpg webp

रिपोर्ट्सनुसार, Amazon चा फेस्टिव्हल सेल 10 ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकतो, जो 18 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. ज्यांच्याकडे Amazon प्राइम सबस्क्रिप्शन आहे, ते एक दिवस अगोदर या सेलचा लाभ घेऊ शकतील.

---Advertisement---

बँक सवलत
सेल दरम्यान SBI बँकेचे ग्राहक SBI डेबिट आणि क्रेडिट कार्डसह 10 टक्के झटपट सूट घेऊ शकतात. जर तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ऑनलाइन व्यवहारांसाठी सक्रिय केले नसेल, तर ते ताबडतोब करा जेणेकरून तुम्हाला Amazon दिवाळी सेल दरम्यान त्याचा लाभ घेता येईल.

डिस्काउंट Amazon Great Indian Festival Sale मधील अनेक वस्तूंवर उपलब्ध होणार आहे. Amazon Festival Sale मध्ये तुम्ही लॅपटॉप (Laptop), स्मार्टवॉच, हेडफोन्स सारख्या वस्तूंवर 55% पर्यंत सूट मिळवू शकता. यासोबतच तुम्हाला किचन, घरातील वस्तूंवर 70% सूट मिळू शकते.

तसेच फर्निचर आणि गाद्यांवर 80% पर्यंत सूट मिळू शकते. जर फॅशन आणि सौंदर्य उत्पादनांवर 50%-80% पर्यंत सूट मिळू शकते. या Amazon सेलमध्ये तुम्ही कपड्यांवर 60% आणि फुटवेअरवर 50% ते 80% पर्यंत सूट मिळवू शकता.

या वस्तूंवर बंपर सवलत. Amazon च्या या सेलमध्ये तुम्हाला टीव्ही आणि उपकरणांवर 75% सूट मिळेल. यासोबतच तुम्हाला वॉशिंग मशिनवर 55% सूट मिळू शकते. त्याच वेळी, अलेक्सा, फायर टीव्ही आणि किंडलवर 55% पर्यंत सूट मिळू शकते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---