जळगाव लाईव्ह न्यूज : 21 ऑक्टोबर 2023 : सध्या सणासुदीचे दिवस सुरु असून येत्या काही दिवसावर दिवाळीसारखा येऊन ठेपला आहे. यादरम्यान, अनेक जण कुटुंबासह गावी जातात. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही विषेश गाड्या चालवीण्याचा निर्णय घेतला आहे. यात पुणे – अमरावती दरम्यान 8 उत्सव विशेष मेमू गाड्या चालवण्यात येणार आहे. तसेच, बडनेरा – नाशिक दरम्यानही उत्सव विशेष मेमू ट्रेन धावणार आहे. या गाड्या भुसावळ मार्गे धावणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अमरावती – पुणे मेमू (4 अप आणि 4 डाउन एकूण 8 सेवा) गाडी क्रमांक 01209 विशेष मेमू अमरावती येथून दि. 5 ते 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत दर रविवारी आणि बुधवारी 12 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी 2 वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल. गाडी क्रमांक 01210 विशेष मेमू पुणे येथून दि. 6 ते २० नोव्हेंबर 2023 पर्यंत दर गुरुवार आणि सोमवारी 6 वाजून 35 वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल.
अमरावती – पुणे गाडीला असे थांबे :
ही गाडी अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन, उरुळी, हडपसर आणि पुणे येथे थांबे घेईल. या गाडीला 8 कार मेमू रेक असतील.
बडनेरा – नाशिक गाडीला या स्थानकांवर असेल थांबा
बडनेरा, मुर्तजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगावं, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड आणि नाशिक असे थांबे असणार आहेत.