२ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी पालिका कर्मचाऱ्याला एसीबीने ठोकल्या बेड्या

डिसेंबर 13, 2025 8:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२५ । दोन लाच हजार रुपयांची मागितल्याप्रकरणी अमळनेरच्या पालिका कर्मचाऱ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या असून मनोज साहेबराव निकुंभअसे या लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

lach

पाणी पुरवठा कर्मचारी गणेश शिंगारे याच्या सुधारित आश्वसित योजनेचा दुसरा हप्ता मिळाला नव्हता. तसेच वेतन निश्चिती झाली नव्हती म्हणून त्यांनी निकुंभ यांची भेट घेतली. त्यांनी मला दोन हजार रुपये द्या, मी मुख्याधिकारीकडून सर्व मंजूर करून आणतो, असे सांगितले होते.

Advertisements

याबाबत शिंगारे यांनी २१ ऑक्टोबर २०२४ रोजी जळगाव लघुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. एसीबीने सापळा रचला. मात्र निकुंभ यांनी लाच स्वीकारली नाही. मात्र रेकॉर्डरमध्ये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते. कारवाई स्थगित झाली होती. याबाबत एसीबीने गणेश शिंगारे यांच्याशी वारंवार कारवाईबाबत संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

Advertisements

अखेरीस ३० नोव्हेंबर २०२५ रोजी नाशिक विभागाचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळण्याचा अहवाल पाठवला होता. त्यावर ५ डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षकांनी परवानगी दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना न्यायालयात नेले असता न्यायाधीश एल.डी. गायकवाड यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now