---Advertisement---
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील फिजीओथेरेपी महाविद्यालयात अ‍ॅल्युमिनी मिट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरेपी महाविद्यालयात अ‍ॅल्युमिनी मिटचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी विदयार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले.

meet

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नगुलकर प्राशसकीय अधिकारी, राहुल गिरी तसेच माजी विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रिजवान खाटीक, उपाध्यक्षा डॉ. कल्याणी नगुलकर, सचिव डॉ. निखिल पाटील आणि इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचरी उपस्थीत होते. यावेळी ४५ च्या वर माजी विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवत नवोदितांना अभ्यासाविषयीच्या टीप्स देत महाविद्यालयात उपलब्ध सोयीसुविधांचा उपयोग कसा करून घ्यावा तसेच भविष्यातील या क्षैत्रातील संधी व वाटा यावर मार्गदर्शन केले.

---Advertisement---

कार्यक्रमाचे संचालन ओजस्वी जनबंधू, आस्था पटेल यांनी तर आभार प्रदर्शन शुभम केंद्रे आणि ऋतूजा शारदुल यांनी केले.यानंतर माजी विदयार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. समारोप राष्ट्रगिताने झाला. या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी ऑनलाईन पध्दतीने सहभाग नोंदवत या विदयार्थ्यांशी संवाद साधून विचार पूस केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment