⁠ 
बुधवार, फेब्रुवारी 28, 2024

जळगावसह या जिल्ह्यांना पुढचे 3-4 तास महत्वाचे ; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुने २०२३ । केरळात अद्यापही मान्सून दाखल झाला नसून त्यापूर्वी राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यातच आता आता भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून (IMD) जळगावसह काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील 3 ते 4 तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

या भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, 30 ते 40 किमी प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहतील, असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

दरम्यान, अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून पुढील १२ तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढत जाणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पावसाची शक्यता नाही, तरी, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.