अल-सूफ्फा कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । पाचोरा येथील अल-सूफ्फा इंटरनॅशनल स्कूल अँड जुनिअर कॉलेज येथे साध्या पद्धतीने स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अल्हाज रसूल व निवृत्त शिक्षक अमीन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
हाजी रसूल, रहीम बागवान, फिरोज़ खान, ऍड.वसीम बागवान, साजिद पठान, मुस्तकीम, ज़ाकिर खाटिक, अमीन देशमुख यांनी यावेळी आपले विचार मांडले व समजामध्ये शिक्षण हे आज खुप महत्वाचे आहे तसेच सध्याची परिस्थिती कठीण आहे सर्वांनी आपली काळजी घ्यावी हा संदेश दिला.
शाळेचे शिक्षक विजय बाविस्कर यांनी एकपात्री नाटक सादर केले व नाटकातून पहिल्या लॉकडाऊनमध्ये मजुरांची झालेली दयनीय अवस्था मांडली
प्रसंगी संस्थाचे अध्यक्ष अल्हाज बागवान आणि संचालक इमाद बागवान, हेडमास्टर खनसा सिद्दिका रईस सौदागर व शिक्षक विजय बाविस्कर, सय्यद मो.जुबेर, फरज़ाना खालील शेख, कलार्क शेख खालील अहेमद आदी उपस्थित होते.