जळगाव लाईव्ह न्यूज । भारती एअरटेलच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एअरटेलने (Airtel) नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन (New prepaid recharge) लाँच केला आहे. हे नवीन प्लॅन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या नवीन नियमांनुसार आहेत, ज्यामध्ये केवळ व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस सेवांसाठी विशेष टॅरिफ वाउचर अनिवार्य केले आहेत.
एअरटेलचा 509 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलच्या 509 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये आता अमर्यादित व्हॉइस कॉल्स आणि 900 एसएमएस संदेशांचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची व्हॅलिडीटी मिळेल. अतिरिक्त एअरटेल रिवॉर्ड्समध्ये Airtel Xstream ॲपवरील विनामूल्य कंटेट, Apollo 24/7 Circle मेंबरशिप आणि विनामूल्य Hello Tunes यांचा समावेश आहे. एअरटेलच्या मते, या व्हॉईस आणि एसएमएस-ओन्ली प्लॅनची प्रभावी किंमत सुमारे 167 रुपये प्रति महिना आहे. यापूर्वी या प्लॅनमध्ये 6GB डेटाही मिळत होता.
एअरटेलचा 1,999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
दीर्घकालीन किंवा वार्षिक व्हॅलिडीटी प्लॅन शोधत असलेल्या Airtel वापरकर्त्यांसाठी, 1,999 रुपयांचा वार्षिक व्हॅलिडीटी प्लॅन उपलब्ध आहे. यामध्ये युजर्सना अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 3,600 SMS संदेश ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडीटी मिळेल. अतिरिक्त एअरटेल रिवॉर्ड्समध्ये Airtel Xstream ॲपवरील विनामूल्य कंटेट, Apollo 24/7 Circle मेंबरशिप आणि विनामूल्य Hello Tunes यांचा समावेश आहे. याआधी हा प्लॅन 24GB डेटासह येत होता. कंपनीने सांगितले की एसएमएस मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, लोकलसाठी 1 रुपये आणि एसटीडीसाठी 1.5 रुपये प्रति एसएमएस आकारले जातील.
हे दोन्ही प्रीपेड प्लॅन एअरटेल थँक्स ॲप आणि एअरटेल वेबसाइटवर उपलब्ध आहेत. इतर ऑपरेटर देखील अशाच योजना लवकरच लाँच करतील अशी अपेक्षा आहे. TRAI ने सर्व ऑपरेटरना डेटाशिवाय स्पेशल टॅरिफ व्हाउचर ऑफर करणे अनिवार्य केले आहे, ज्यात व्हॉइस आणि एसएमएस फायदे आहेत. हे त्या लोकांसाठी, विशेषतः वृद्धांसाठी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी अधिक उपयुक्त ठरेल. ज्यांना इंटरनेटची आवश्यकता नसते अशा युजर्ससाठी हे रिचार्ज प्लॅन फायद्याचे ठरणार आहेत.
वार्षिक डेटा प्लॅन
एअरटेल आता 3,599 रुपयांचा वार्षिक प्लॅन ऑफर करत आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळणार आहेत. त्यासोबत अनेक फायदे होतील. तुम्ही जर संपूर्ण वर्षासाठी प्रीपेड रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे.