---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

अहमदाबाद-जळगाव विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी; जळगाव विमानतळावर धावपळ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२४ । देशातील वेगवेगळ्या भागात मागील काही दिवसांमध्ये विविध यंत्रणांना सातत्याने विमानांना बाॅम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळत आहे. यामुळे विमान कंपनी व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच अहमदाबादहून जळगावला येणाऱ्या विमानालाही धमकीचा संदेश मिळाल्याने एअरपोर्ट अॅथोरिटी व पोलिस प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

airplain jpg webp

बॉम्बशोधक पथकाने केलेल्या तपासणीत काहीही आढळून न आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. मंगळवारी रात्री नऊ वाजता हा प्रकार जळगाव विमानतळावर घडला. जळगावहून अलायन्स एअरची अहमदाबाद-जळगाव सेवा मंगळवारपासून सुरू झाली. मंगळवारी सेवेचा पहिला दिवस होता.

---Advertisement---

अहमदाबाद येथून जळगावला साडेआठ वाजता येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा संदेश एअरपोर्ट अॅथोरिटीला मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम, सहायक निरीक्षक गणेश वाघ, हवालदार, दत्तात्रय बडगुजर प्रदीप चौधरी, अभिजीत सैंदाणे, राहुल रगडे व विशाल कोळी यांचे पथक तातडीने दाखल झाले. बॉम्बशोध व श्वान पथकालाही यावेळी पाचारण करण्यात आले.

अहमदाबाद – जळगाव या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेत बॉम्बशोधक पथकामार्फत तपासणी करण्यात आली. संशयास्पद काहीच आढळून आले नसल्याचं पोलिस उपअधीक्षक संदीप गावित म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---