---Advertisement---
भुसावळ

अहमदाबाद आणि प्रयागराज दरम्यान अतिरिक्त विशेष ट्रेन

new-trains-from-bhusawal-to-surat-and-nandurbar
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ ।  रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अहमदाबाद ते प्रयागराज दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

new-trains-from-bhusawal-to-surat-and-nandurbar

तपशील खालीलप्रमाणे:

---Advertisement---

गाडी क्रमांक 09267  डाऊन विशेष अहमदाबाद येथून दिनांक 25.03.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर गुरुवार रोजी  16.35 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 16.50 वाजता प्रयागराज ला पोहोचेल.

गाडी क्रमांक 09268 अप विशेष प्रयागराज येथून  दिनांक 26.03.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवार रोजी 19.00 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 19.00 वाजता अहमदाबाद ला पोहोचेल.

स्टॉप – नंदियाद, आनंद, वरोदरा, भरूच, सुरत, नंदुरबार, अमळनेर, जळगांव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर

संरचना: –  १ वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, ३ वातानुकुलीत तृतीय श्रेणी, १० शयनयान आणि ५ द्वितीय श्रेणी आसन.

उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.

प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---