---Advertisement---
जळगाव जिल्हा

शेतकरी बांधवांनी डिएपी खतास पर्यायी खतांचा वापर करावा; कृषी विभागाचा सल्ला

dap fertilizer rate
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२५ । महाराष्ट्र राज्य मृद परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांच्या आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली राबवणारे आघाडीचे राज्य आहे. सध्या राज्यात खरीप हंगामाची पेरणी सुरू असून, डिएपी (Di-Ammonium Phosphate) खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डिएपीमध्ये १८ टक्के नत्र व ४६ टक्के स्फुरद हे प्रमुख अन्नद्रव्ये असतात.

dap fertilizer rate

डिएपी खताची संभाव्य कमतरता लक्षात घेता, त्यास पर्यायी खतांचा वापर करणे गरजेचे ठरत आहे. यामध्ये एसएसपी (Single Super Phosphate) हे सर्वाधिक वापरले जाणारे पर्यायी खत असून, त्यात १६ टक्के स्फुरद, सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळतात. विशेषतः तेलबिया पिकांसाठी सल्फरयुक्त एसएसपीचा वापर फायदेशीर आहे. डिएपीच्या एका गोणीऐवजी, अर्धी गोणी युरिया व तीन गोणी एसएसपी यांचा समन्वयित वापर डिएपीस योग्य पर्याय ठरतो.

---Advertisement---

तसेच, एनपीके (NPK) प्रकारातील संयुक्त खते जसे की,
NPK 10:26:26
NPK 20:20:0:13
NPK 12:32:16
NPK 15:15:15

यांच्या वापरामुळे पिकांना नत्र, स्फुरद आणि पालाश या तीनही प्रमुख अन्नद्रव्यांचा समतोल पोषण मिळतो. त्यामुळे या संयुक्त खतांचा उपयोगही पिकांसाठी उपयुक्त ठरतो. टिएसपी (Triple Super Phosphate) हे आणखी एक प्रभावी पर्यायी खत असून, त्यामध्ये ४६ टक्के स्फुरद आढळतो. डिएपीच्या एका गोणीच्या बदल्यात अर्धी गोणी युरिया व एक गोणी टिएसपी वापरल्यास तोही डिएपीला उत्तम पर्याय ठरतो.

कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, खरीप हंगामात केवळ डिएपी खतावर अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध पर्यायी खतांचा योग्य प्रकारे वापर करावा, जेणेकरून पेरणी व उत्पादनात अडथळा येणार नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment