---Advertisement---
महाराष्ट्र

बस अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखाला पडणार महागात ; ठोठावण्यात येणार ‘इतका’ दंड

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२३ । राज्यातील महामंडळाच्या अनेक एसटी बससह काही बस स्थानकाची दयनीय अवस्था झालीय. अनेकदा फाटलेल्या सीट आणि प्रवाशांनी पिचकारीचे मारलेले फटकारे हे चित्र बऱ्याचद एसटी बसमध्ये दिसून येते. पण ते आता लवकरच बदलणार आहे.

bus 3 jpg webp

एसटी बस आणि एसटी बस स्थानकात स्वच्छता राखली जावी यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आता एखादी बस अस्वच्छ दिसल्यास आगार व्यवस्थापकाला ५०० रुपयांच्या दंडाचे आदेश महामंडळाने काढले आहेत.त्याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून होणार आहे.

---Advertisement---

एसटीकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान राबवले जात आहे. त्याअंतर्गत शंभरपैकी 10 टक्के गुण बसच्या स्वच्छतेला दिले जातात. तरीही सर्रास बस अस्वच्छ असल्याचे निदर्शनास येत असून त्याकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष होत आहे. त्याची गंभीर दखल महामंडळाने घेतली आहे.

बस स्थानक आणि बसची स्वच्छता पाहण्यासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून पालक अधिकारी, स्वच्छता अभियानाचे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष, समिती सदस्य आणि विभाग नियंत्रक यांच्याकडे बसच्या स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी महिन्याला किमान पंधरा बसची तपासणी करणे अपेक्षित आहे. त्यांनी बस अस्वच्छ असल्याचे निश्चित केल्यानंतर आगार व्यवस्थापकांना दंड लागणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---