⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | सुषमा अंधारेंच्या आरोपानंतर जळगावचे जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश.. नेमके आदेश काय?

सुषमा अंधारेंच्या आरोपानंतर जळगावचे जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश.. नेमके आदेश काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२४ । नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जळगावात सभा घेतली. मुख्यमंत्र्यांच्या या सभेनंतर जळगावातील आदित्य लॉन्स येथे शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

त्यांनी पैसे वाटप होत असल्याचा कथित व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर करत कारवाई करण्याची मागणी केली होती. आता या प्रकाराबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याबाबतचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागवण्यात आला आहे.  त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जळगावचे प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांना या प्रकरणाची चौकशी करण्याबाबतचं पत्र उपजिल्हाधिकारी यांनी दिलं आहे.

उमेदवारांकडून साडी वाटप, नथनी तसेच कपडे वाटपाबाबत कुठल्याही शिक्षकाची तक्रार आलेली नाही. पैठणी साडी, महागडे कपडे तसेच नथ वाटप झाल्याबाबत शिक्षकाची तक्रार आल्यास त्यानुसार त्या प्रकाराची चौकशी करून कारवाई करणार असल्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांची असल्याची माहिती मिळत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे नेमके आदेश काय?
आदित्य लॉन्स या ठिकाणी 22 जूनला झालेल्या सभेसाठी परवानगी घेण्यात आली होती का? तसं नसल्यास नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.
सदर चित्रीकरणात दिसून येणाऱ्या इसमांची शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांच्यामार्फत ओळख पटवावी.
सदर सभेदरम्यान झालेल्या चित्रीकरणाचे फुटेज तात्काळ ताब्यात घेण्यात येऊन आणि सदर चित्रीकरणाची भरारी पथकामार्फत चौकशी करावी.
सदर चित्रीकरणात पैसे घेऊन जात असल्याबाबतचे अभिलेख जप्त करण्यात यावे. अभिलेख गहाळ झाल्यास भारतीय पुरावा अधिनियम 1872 अन्वये आवश्यक ती कार्यवाही करावी.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.